Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

सरकारी नोकरीचा खजिना

http://www.gjtutorial.com

नोकरीच्या शोधत असलेला जवळपास प्रत्येक भारतीयच सुरक्षित आणि शाश्‍वत नोकरी (जॉब सिक्युरिटी असलेली) मिळविण्यासाठी सर्वात जास्त प्राधान्य देतो. सध्या आय.टी., आय.टी..एस. व इतर नवीन उद्योग क्षेत्रातील नोकर्‍यांची चलती आहे. तरी नुकताच तडाखा देऊन गेलेल्या जागतिक आर्थिक मंदीची झळ या क्षेत्रांना व त्यातील नोकरदारांना चांगलीच जाणवली होती. दरम्यान, जॉब सिक्युरिटीचा उल्लेख केलाच तर कोणाच्याही नजरेसमोर एक पर्याय हमखास येतो व तो म्हणजे सरकारी किंवा बँकांच्या नोकरीचा. सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून तर या क्षेत्रातील सर्व पदांचे पगार जवळ-जवळ खाजगी क्षेत्राच्या बरोबरीला आले आहेत. त्याशिवाय ह्या सरकारी नोकर्‍या, त्यांच्यात मिळणारा आदर आणि सोयी-सुविधांसाठी ही नावाजल्या जातात. प्रत्येक लहान मुलाचे लष्करात किंवा नौसेनेत अधिकारी अथवा वायु-सेनेत पायलट, आयपीएस-आयएएस अधिकारी होणे हे स्वप्न असतेच. या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक माहिती आत्तापर्यंत ङ्गक्त वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातींतून किंवा सरकारी रोजगार कार्यालयाच्या (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) सूचनापटावर वाचणे शक्य होते. पण आता या अशा नोकर्‍यांची संधी उपलब्ध असल्याची माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेट व त्यावरील वेबसाईट्स हाही एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्याच पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.

http://upscportal.com व http://www.gjtutorial.com ह्या वेबसाइट्स आपल्याला मोफत वापरायला मिळतात. या साईट्स भारतीय लोक सेवा आयोग (UPSC म्हणजेच UNION PUBLIC SERVICE COMMISIION) च्या परीक्षा, उदा: CDS (Combined Defense Services), CSE (CIVIL SERVICES EXAMINATION), IFS (INDIAN FOREST SERVICES), NDA/ NA (NATIONAL DEFENCE ACADEMY / NAVAL ACADEMY) , या व अशा ३३ सरकारी परीक्षा सर्व बँकांच्या व सरकारी संस्था व आस्थापनांच्या प्रवेश परीक्षांच्या परिक्षार्थींना भरपूर उपयुक्त ठरू शकतात.

साधारणत: सरकारी संस्था व आस्थापनांच्या परीक्षा ह्या कठीण मानल्या जातात. त्याचबरोबर सरावासाठी त्यांच्या मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका मिळणे ही कठीण असते. हा पेच सोडविण्यासाठी ह्या सर्व परीक्षांच्या प्रत्येक विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचे नमुने त्याचबरोबर मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका ही या साईटस्वर उपलब्ध आहेत ज्या आपण डाऊनलोड करू शकतो. यामुळे या परीक्षांचा आपल्याला सराव होण्यास ह्या साईट्सचा भरपूर उपयोग होऊ शकतो.

http://upscportal.com व http://www.gjtutorial.com वर आपल्याला ह्या सर्व या परीक्षांचे अर्ज (ऍप्लिकेशन फॉर्म्स) व विषयाचा अधिकृत अभ्यासक्रम ही मिळवता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा काही वेळेस होणारा अभ्यासक्रमाबद्दलचा गोंधळ कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर आपल्याला या साईटस्वर सर्व सरकारी परीक्षांचे निकालही लगेचच कळतात.
http://upscportal.com वर जगातील व खासकरून भारतातील सर्वच घडामोडींवर उत्कृष्ट लेख व माहिती असते. या माहितीच्या आधारे सामान्य ज्ञान वाढविण्यास भरपूर वाव आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे http://upscportal.com वर NCERT अभ्यासक्रमाच्या नोट्स ही उपलब्ध आहेत. या नोट्स मोङ्गत उपलब्ध असल्या कारणांनी परीक्षार्थींचा महागड्या पुस्तकांवर होणारा खर्च बर्‍याच प्रमाणात वाचू शकतोhttp://upscportal.com वर आपण सामान्य ज्ञानाच्या व वर्तमान घडामोडींच्या प्रश्‍नमंजुषा (क्विझ) सोडवू शकतो. सर्वात मुख्य म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या अभ्यासक्रमानुरुप या प्रश्‍नमंजुषा असतातhttp://upscportal.com वर परीक्षांसाठी मार्गदर्शन पुस्तिका ही उपलब्ध आहेत. या मार्गदर्शन पुस्तिकांच्या व्यतिरिक्त http://upscportal.com वर सारखे व साधारणत: सर्व परीक्षार्थींकडून विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांचा (क्विझ) संच आणि महत्त्वाच्या प्रश्‍नांचा संचयही आहे. या प्रश्‍नांमुळे प्राधान्य कोणत्या प्रकारच्या व कोणत्या विशिष्ट प्रश्‍नांना द्यायचे ते ठरविणे सोपे होतेhttp://upscportal.com वर आपल्याला ह्या सर्व परीक्षांच्या संपुर्ण नोट्स रु.७५०/- ते रु.१२००/- पर्यंत मिळतातhttp://upscportal.com व http://upscportal.com वर आपले नाव व ईमेल आय.डी. दिला की आपल्याला त्यांच्याकडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटर्स) पाठविण्यात येतात. यामध्ये परीक्षांच्या आगाऊ सूचना, परीक्षांशी संबंधित बातम्या, जगात व भारतातील घडामोडींची माहिती, परीक्षांच्या नोट्स आणि माहितीचा समावेश असतो.

त्याशिवाय परीक्षांच्या गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे व्हीडीओजही upscportal.com वर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ह्या मुलाखतींमुळे आपल्याला ह्या विजेत्यांच्या अनुभवाच्या बोलांचा भरपूर ङ्गायदा होऊ शकतो. त्यांच्या अनुभवातून आपण उचित गोष्टी घेऊन त्या अमलात आणू शकतो. upscportal.com वरील इतर नेटकरांबरोबर आपण विचार-विनिमय (फोरम डिस्कशन) करू शकतो. या विचार-विनिमयांमुळे आपल्याला ज्ञानाच्या व अनुभवांच्या आदान-प्रदानात भरपूर मदत होते.

या दोन साईटसच्या व्यतिरिक्त www.employmentnews.gov.in हे भारत सरकारचं स्वत:चे संकेतस्थळ आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या या साईटच्या व्यतिरिक्त स्वत:चे साप्ताहिक वर्तमानपत्रही प्रकाशित होते ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सरकारी नोकर्‍यांचे अर्ज व जाहिराती असतात. ही साईट हिंदी भाषेत ही उपलब्ध आहे त्यामुळे साधारणत: प्रत्येक भारतीयाला ही साईट वाचता येण्याची सोय आहे.

पुढे येणारा काळ हा नक्कीच कठीण व अनिश्‍चिततेने भरलेला आहे. या काळात आपल्या स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे व राष्ट्राचे हीत राखणे व जपणे ही सर्वांची प्रथम जबाबदारी व प्राथमिकता असेल.
त्यासाठी सरकारी नोकरी हा अनेक उपलब्ध पर्यायातील एक उत्तम पर्याय आहे व ह्या पर्यायांची संपूर्ण व जशीच्या-तशी माहिती मिळवून त्याच्या अनुषंगाने आपली तयारी व सराव करण्यासाठी आणि यातूनच आपल्या देशाच्या सेवेत रुजू होण्यासाठी या सर्व उल्लेखिलेल्या इंटरनेटवरील वेबसाईटस्चा उपयोग आपल्याला बराच उपयुक्त ठरेल

0 comments:

Post a Comment