Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

स्वीट कॉर्न चिकन सूप

साहित्य:
दोन कप स्वीटकॉर्न, १ टीन(१२कप) चिकन स्टॉक, अर्धा कप चिकनचे तुकडे, ३ चमचे कॉर्नफ्लोवर, २ अंडी, ३ टीस्पून साखर, दीड चमचा मीठ, २ चिमूट अजिनोमोटो, २ चमचे मिरी पावडर, ४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी व्हाईट व्हिनेगर.

कृती:
चिकनच्या हंडीमध्ये १० ते १२ कप पाणी व मीठ घालून शिजत ठेवावे. चिकत शिजल्यानंतर त्याचे बोनलेस पीस सोलून काढावे व पाणी गाळून १२ कप स्टाँक तयार करावा. या चिकन स्टाँकमध्ये स्वीटकाँर्न, साखर, अजिनोमोटो, मिरी पावडर  घालून उकळत ठेवावे. मधून मधून ढवळावे. स्टाँक उकळू लागल्यावर थोड्या थंड पाण्यात काँर्नफ्लोवर मिसळून उकळत्या सुपात ओतावे. पुन्हा उकळेपर्यंत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. बेताचे दाट झाल्यानंतर ५ मि. शिजू द्यावे. नंतर त्यात चिकनचे  तुकडे घालावेत. अंडी चांगली फेटून उंच हाताने बारीक धार पडेल अशी एका हाताने ओतत रहावी व सूप ढवळावे. सूप उकऴल्यावर गॅस बंद करावा. सूप सर्व्ह करताना सोया साँस,  चिली साँस, व्हिनिगरच्या मिरची बरोबर द्यावा. व्हिनिगरच्या मिरच्या बारीक चिरून अर्धी वाटी व्हिनिगरमध्ये घालाव्या व मिरच्या सफेद होईपर्यंत उकळाव्या व गॅस बंद करावा.

0 comments:

Post a Comment