Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

Snapdeal.com

Snapdeal.com


इंटरनेट वापरताना आपल्यासमोर अचानक एखादी जाहिरात येते. स्पॅम म्हणजेच निरर्थक बंडलबाजी म्हणून आपण ती लगेचच बंदही करतो. तसेच आपल्याला अनेक वेळेस टेलिकॉलर्सकडून ‘ऑर्स’ विषयी ङ्गोन करून सांगितले जाते. पण नॉट इंटरेस्टेड असे उत्तर देऊन आपण ऑफर न ऐकताच फोन बंद करून टाकतो. ह्या दोन्ही क्रिया बर्‍याच अंशी योग्यही म्हणता येतील. पण गेल्याच आठवड्यात ह्या अशाच ऑफरने मला धक्का दिला. एका मित्राने मला सांगितले की इंटरनेटवर हल्ली अशा काही साईटस् आल्या आहेत ज्यावरून आपल्याला एखाद्या विशिष्ट ब्रॅन्ड किंवा कंपनीचेच एखादे उत्पादन बाजारातील किंमतीपेक्षा बरेच स्वस्तात मिळू शकते. मी त्याला वेड्यात काढले.

अरे अशा साईटस् व ऑङ्गर्स ङ्गसव्या असतात, सांगतात एक व देतात दुसरंच, असं मी त्याला म्हणालो. पण त्याने मला प्रत्यक्ष ह्या अशा ऑफर साईटचा अनुभव दिला व माझा हा गैरसमज खोडून काढला. आम्ही दोघांनी साईटवरून फक्त रु.९९/- आईस्क्रीमचे एक कुपन विकत घेतले व एकही पैसा जास्त न देता आम्ही दोघांनी ह्या साईटशी संलग्न एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन रु.७००/- रुपयांच्या आईस्क्रीम फस्त केलं.

आपण ज्या साईटबद्दल बोलत आहोत ती आहे www.snapdeal.com ह्या साईटवर आपल्याला मोबाईल, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा: कॅमकॉर्डर्स, टेलिङ्गोन, टी.व्ही., इत्यादि), संगणक (लॅपटॉप, डेस्कटॉप) व त्याची उपसाधने (उदा: हार्ड ड्राईव्ह, मॉनिटर, प्रिंटर, इत्यादी), सुगंधित द्रव्ये, दागदागिने, पुस्तकं, सिनेमा, पादत्राणे, स्वयंपाकाची भांडी, खेळणी, सौंदर्यप्रसाधने व विविध हॉटेल्स / उपहारगृहांच्या (ऑङ्गर्स), इत्यादी विकत घेता येते.

ह्या साईटवरून खरेदी करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या साईटच्या माध्यमातून विकत घेतलेल्या गोष्टी आपल्याला बाजार भावापेक्षा बर्‍याच कमी किंमतीत मिळतात. ही सूट मूळ किंमतीवर ५% ते ९०% एवढ्या प्रमाणात असते. पण २५% - ५०% टक्क्यांची सूट ही साधारणपणे ह्या साईटवरील गोष्टींवर दिली जाते. ही सूट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या साईटची सदस्यता घ्यावी लागते जी आपल्यालाच मोत मिळते. यासाठी आपल्याला साईटवर नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना आपण राहत असलेले शहर, आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आय.डी. देणे अनिवार्य असते, कारण ही माहिती आपल्याला ह्या साईटवरील व्यवहार करताना लागते. ही माहिती टाकल्यानंतर आपण दिलेला ईमेल आय.डी. बरोबर आहे की नाही ह्याची खात्री करण्यासाठी ह्या साईटकडून आपल्याला एक पडताळणी ईमेल पाठविला जातो. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या ईमेल आय.डी.ची ओळख पटवून दिली की आपण ह्या साईटचे सदस्य झालो. एकदा का आपल्याला सदस्यता मिळाली की मग आपण ह्या साईटवरील उपलब्ध ऑफर्स बघू व विकत घेऊ शकतो.

एखादी ऑफर विकत घेण्यासाठी ह्या साईटवर साधारणपणे एक आठवडा ठेवली जाते. एकदा का आपण ऑफर विकत घेतली की आपल्याला त्याची एक पावती (व्हाऊचर) मिळते. पावतीबरोबर आपल्याला आपण घेतलेल्या ऑफरची माहिती ह्या साईटकडून एस.एम.एस. देखील केली जाते. ऑफरचा उपयोग करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्ही ही पावती किंवा हा एस.एम.एस. दाखवून त्यांच्या उत्पादनावर किंवा सेवेवर ऑफरमध्ये नमूद केलेल्या सुटीचा लाभ घेऊ शकतो. एखादी ऑफर विकत घेण्यासाठी आपण क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग व कॅश कार्डचा उपयोग करू शकतो. ऑफरचे पैसे भरताना आपल्याला थोडीशी रक्कम ह्या पद्धतीने भरायची असते व उरलेली रक्कम आपण थेट उत्पादक किंवा सेवादात्याला देऊ शकतो. ऑफरच्या किंमतीत करसुध्दा सहसा समाविष्ट केलेले असतात. जर समजा आपण एखादी वस्तू घरपोच मागविलेली असेल तर, या मागणीतील ती वस्तू कुठपर्यंत पोहोचली हे आपण ह्या साईटवरूनच जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या प्रत्येक मागणी (ऑफर) बरोबर मिळणार्‍या ऑर्डर आय.डी.चा उपयोग करू शकतो. जर समजा आपण एखाद्या हॉटेलची ऑफर खरेदी केली असेल तर त्या हॉटेलमध्ये मिळणार्‍या पदार्थांची यादी व किंमत देखील बघता येते.

उत्पादने व सेवा विकत घेताना त्यांची निवड आपण एखादी विशिष्ट कंपनी किंवा ब्रॅन्ड, आपली खर्च करण्याची तयारी, एखाद्या उत्पादनातील प्रकार, विशिष्ट शहर अशा विविध परामूल्यांच्या आधारावर करू शकतो. भारताच्या २० शहरात ही साईट आपली सुविधा पुरविते. ज्या विक्रेत्यांकडून आपण उत्पादने व सेवा या साईटच्या माध्यमाने विकत घेणार असतो त्यांचा पूर्ण पत्ता व अगदी गुगल मॅपवरील स्थळदेखील आपल्याला बघता येते. ऑङ्गरचा उपयोग करण्याच्या अगोदर आपण ज्या विक्रेत्याकडे जाणार असू त्यांच्याशी बोलून आपली येण्याची वेळ निश्‍चित करणे हे अधिक योग्य ठरते.

ही साईट मोबाईलवरदेखील उपलब्ध आहे. विविध ऑङ्गर्सबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्या साईटकडून नियमित एस.एम.एस. व ईमेल्सदेखील पाठविले जातात. त्याशिवाय आपण ह्या साईटच्या आर.एस.एस. फीड्‍स निवड देखील करू शकतो. आपण इतर व्यक्तींना ईमेल करून ह्या साईटची सदस्यता स्वीकारण्यासाठी आमंत्रण पाठवू शकतो. त्याचबरोबर आपण एखादी ऑफरदेखील दुसर्‍या व्यक्तींना सुचवू शकतो.

जर आपण पाठविलेल्या ऑफरचा स्वीकार समोरच्या व्यक्तीने केला तर आपल्या स्नॅपडीलच्या खात्यात रु.१००/- जमा केले जातात. एकच व्यक्ती या साईटवर दोन खाती उघडू शकते. स्नॅपडीलच्या आपल्याच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात आपण पैसे फिरवू शकतो. ही साईट वापरताना एक अडचण जाणवली, ती म्हणजे ही साईट उघडली की तिच्या होमपेजवर कसे जायचे हे पहिल्यांदा या साईटला भेट देणार्‍यांसाठी थोडे कठीण आहे. ह्यावर उपाय म्हणजे साईट उघडली की ती एकदा रिफ्रेश करून घ्यावी (यासाठी आपण माऊसचा उपयोग करू शकतो किंवा एफ ५ हे बटणही दाबू शकतो).

जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं’, ही म्हण खरं म्हणजे नेहमी नकारात्मक अर्थानेच वापरली जाते. पण या साईटसाठी ही म्हण लागू पडते ती चांगल्या अर्थाने. एकविसाव्या शतकात जगात जवळ-जवळ सर्वच देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये ग्राहक हा राजा होत चालला आहे. स्नॅपडील हा असेच ‘ग्राहकाला राजा’ बनविणारे संकेतस्थळ आहे आणि त्याचे घोषवाक्य आहे ‘स्वस्तात मस्त’.

0 comments:

Post a Comment