Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

सिबिल - Credit Information Bureau (India) Limited

CIBIL म्हणजे क्रेडिट इनफोर्मेशन ब्युरो (इंडिया)


पहिल्यांदाच ऐकल्यास सिबिल हे नाव एखादे उत्तर भारतीय आडनाव वाटणे साहजिकच आहे. पण बँकिंग क्षेत्र सोडलं तर सामान्य माणसाला सिबिल हा शब्द तसा नवाच आहे. त्यामुळे सर्वात अगोदर आपण सिबिल म्हणजे काय ते पाहूया.  सिबिल CIBIL म्हणजे क्रेडिट इनफोर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड.  ही संस्था भारतातील जवळजवळ सर्वच राष्ट्रीतकृत बँका व कर्ज पुरवठेदार संस्थाच्या सर्वच ग्राहकांच्या आर्थिक माहितीच्या तपशीलवार नोंदी ठेवते.

सध्या सिबिलकडे भारतातील ५०० राष्ट्रीयकृत बँका व कर्ज पुरवठेदार संस्थाच्या सदस्य म्हणून नोंदविलेल्या आहेत. त्यांचे १७० दशलक्ष ग्राहक (व्यक्ती) व ६.५ दशलक्ष ग्राहकांच्या (कंपन्या) तपशीलवार नोंदी व माहिती सिबिलकडे आहे. भारतातील या सार्‍या बँकिंग संस्थांकडून कर्ज, क्रेडिट कार्ड, इत्यादी मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सिबिलशिवाय पर्याय नाही. ते कसे ते आता आपण पाहूया.

ज्यावेळेस आपण कर्ज, क्रेडिट कार्ड, इत्यादी घेण्यासाठी बँकेत जातो त्यावेळेस सर्वात अगोदर आपली क्रेडिट प्रोफाईल तपासली जाते.  ह्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये एखाद्या व्यक्तीने सिबिलच्या ५०० सदस्य राष्ट्रीयकृत बँका व कर्ज पुरवठेदार संस्थाबरोबर केलेल्या कुठच्याही व्यवहाराचा म्हणजे घेतलेल्या कर्जांचा, ठेवींचा, क्रेडिट कार्डांचा व इतर व्यवहारांचा पूर्ण तपशील ठेवला जातो. यात अगदी आपल्या खात्यातील शिल्लक पैसे (बॅलन्स), आपले परत आलेले चेक, आपण घेतलेली कर्जं, त्यांची थकबाकी असल्यास ती, आपण घेतलेली क्रेडिट कार्डस, आपल्या सगळ्या खात्यांच्या पूर्ण व्यवहारांची माहिती, इत्यादीपर्यंतची सारीच माहिती यात असते.

ह्या तपशिलावरून आपली क्रेडिट प्रोफाईल तयार होते. ह्यातच आपली सर्वसाधारण माहिती जोडली जाते व त्यामधून तयार होतो आपला ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ ज्याच्या आधारावर आपल्याला बँकेशी पुढेचे व्यवहार करता येतात. ही सारी प्रक्रिया ही आपल्या पॅनकार्डाच्या युनिक क्रमांकावर आधारलेली आहे. 

पण या प्रक्रियेत सामान्य माणसाला त्रास होण्याची काही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे 

१)      समजा आपण एखाद्या बँकेचे कर्ज घेतले, काही काळासाठी आपले हप्ते भरण्यात खंड पडला, ज्यामुळे आपले नाव सिबिलच्या ‘थकबाकीदार’ म्हणजेच डिफॉल्टर यादीत आपल्या बँकेने दिले. पण नंतर आपण जी काही थकबाकी होती ती भरली व मोकळे झालो तरी एखाद्या वेळेस आपले नाव बँकेच्या नजरचुकीमुळे किंवा दिरंगाईमुळे सिबिलच्या ‘त्या’ थकबाकीदार यादीमध्ये तसेच असण्याच्या घटना झाल्या आहेत

२)      काही प्रकरणं आपण अशी ऐकतो की आपण आपले क्रेडिट कार्ड वापरलेलेच नसते. पण तरी आपल्या नावावर पैसे चढत जातात व मग आपले नाव सिबिलच्या ‘थकबाकीदार’ यादीत समाविष्ट होते व तेही विनाकारण.
इकडे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे सिबिलच्या या ‘थकबाकीदार’ यादीतून आपले नाव निघाल्याच्या सहा महिन्यानंतरच आपल्याला कोणत्याही बँकेतून कार्ड किंवा कर्ज मिळण्याची सोय पुन्हा मिळू शकते. हे लक्षात घेऊनच, वरील प्रसंग टाळण्यासाठी आपल्याला थेट सिबिलने त्यांच्या वेबसाईटवर हीं www.cibil.com आपली त्यांच्या डेटाबेसमधील स्थिती म्हणजेच आपला क्रेडिट स्कोअर व क्रेडिट रिपोर्ट जाणण्याची सोय दिली आहे. ही माहिती जाणणे आपल्याला कर्जासाठी अर्ज करतानादेखील उपयोगास येऊ शकते. कारण आपण कर्जासाठी अर्ज करण्याच्या आधी, आपल्याला आपला क्रेडिट स्कोअर माहीत असला तर आपला कर्जाचा अर्ज मान्य होईल का व झाला तर किती कर्ज मंजूर होईल याचा व्यवस्थित अंदाज आपल्याला बांधता येतो.

हा अंदाज आल्यामुळे आपल्याला जे काम या पैशातून करायचे आहे ते कसे व किती खर्चाच्या मर्यादेत करता येईल हे ठरविणे व त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी सोयीस्कर ठरते. त्याशिवाय समजा जर आपल्या कर्जाचा अर्ज नामंजूर झाला तर त्याच्या योग्य समर्थनार्थ कारण समजण्यासदेखील मदत होते.

आता ह्या साईटवरील क्रेडिट स्कोअर व क्रेडिट रिपोर्ट जाणून (मिळविण्याची) घेण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती घेऊया:

) सर्वात आधी आपल्याला सिबिलच्या साईटवर जाऊन आपला क्रेडिट स्कोअर व क्रेडिट रिपोर्ट जाणून घेण्यासाठीचे ऑनलाईन अर्जपत्र भरावे लागते.
) त्यानंतर या सेवेचे शुल्क म्हणून आपल्याला रु.४७०/- भरावे लागतात जे आपण नेटबँकिंग किंवा डेबिट / क्रेडिट / कॅश कार्डच्या माध्यमाने भरू शकतो.
) पैसे भरल्यानंतर त्या-त्या व्यक्तीला सिबिलचा एक युनिक नोंदणी क्रमांक व व्यवहार क्रमांक दिला जातो.
)  त्यानंतर आपल्याला आपल्या बँकेच्या व्यवहारासंबंधित ३-५ प्रश्‍न, साईटवरच विचारले जातात.
) या सार्‍या पायर्‍या पार करून आपली नोंदणी यशस्वी झाली की मग आपल्याला ई-मेलद्वारेच आपला क्रेडिट स्क्रोर व क्रेडिट रिपोर्ट पाठविला जातो.

सिबिल हा सारा उपक्रम हा मुख्यत: बँकांच्या फायद्यासाठी बँकांनीच चालू केला आहे. ह्याचा सर्वात मुख्य फायदा असा झाला आहे जे लोक बँकांना फसविण्याच्या हेतूने त्यांच्याकडून कर्ज घेतात व नंतर पसार होतात त्यांचा त्या सुप्त हेतूंना बर्‍याच प्रमाणात आळा बसला आहे कारण सगळ्याच बँकांना सर्वच लोकांचे सारेच व्यवहार मग ते अगदी भारतातील कोणत्याही बँकेबरोबर का असेना कळायला लागले आहेत.

अमेरिकेत २००८ साली आलेल्या आर्थिक मंदीचे एक कारण हे ग्राहकाबद्दल कुठचीही खातरजमा केल्याशिवाय झालेले असे फसवे व्यवहार हेदेखील होते ज्याला आपण ‘सब प्राईम क्राईसिस’ ह्या नावाने ओळखतो. कुठच्याही देशाचा मूलभूत पाया हा त्याच्या अर्थव्यवस्थेवरच अवलंबून असतो. त्यामुळे ती सशक्त व सुदृढ होण्यासाठी बँकांनी व सरकारनी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्यच आहे.


कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

0 comments:

Post a Comment