Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

आप्पे


साहित्य:
२ वाटया बारीक रवा, १ नारळाचे दाटसर दूध, २ सपाट वाटया साखर, ४-५ वेलदोडयाची पूड, मीठ, काजुचे तुकडे, तूप, सोडा.

कृती:
नारळाच्या दाट दूधात रवा, साखर घालून चिमूटभर मीठ घालून भज्याच्या पीठासारखं पीठ भिजवावे. पीठ ३-४ तास भिजल्यावर त्यात ४ टेबलस्पून तूप गरम करून घालावे. पाव चमचा सोडा घालून खूप फेटावे. त्यात वेलदोडा पूड, काजू, बेदाणे व केशर(जमल्यास) घालावा. आप्पेपात्र गरम करून त्यात प्रत्येक वाटीत१ चमचा तूप घालावे. आप्प्याचे पीठ प्रत्येक वाटीत अर्धी वाटी घालावे. मंद आच ठेवून आप्पेपात्रावर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढावे. आप्पे फुगून आलेले असतील ते विणायच्या सुईने अथवा चमचाच्या टोकाने पात्रात उलटवावे. दोन्ही बाजूने गुलाबी झाले की काढावे.

0 comments:

Post a Comment