Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

पनीर मेथी

साहित्य:
२ वाटी पनीरचे तुकडे, १ जुडी मेथीची भाजी, १ टोमॅटो, १ चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, मीठ, २ टेबलस्पून तेल, ६-७ काजू.

कृती:
पनीरचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून बदामी रंगाचे तळून घ्यावेत. मेथीची पाने खुडून घ्यावीत. टोमॅटो बारीक कापावा. काजू थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करावी.
 
तेल तापवून त्यात मेथीची पाने परतावी. पाने शिजली की व मऊ पडली की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटोला रस सुटला की त्यात मिरची पूड, हळद, धनेपूड व जिरेपूड, मीठ घालून मंद गॅसवर शिजवावे. २ मि. त्यात तळलेले पनीर घालून सर्व ढवळून घ्यावे. त्यात काजूची पेस्ट घालावी. वाफ आली की गॅस बंद करावा.

0 comments:

Post a Comment