Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

बालरक्षक


ऑनलाईन प्रिडेटर म्हणजे असे समाजकंटक जे इंटरनेटच्या उपयोगाने लहान मुले व अजाण इंटरनेट उपयोगकर्त्यांची फसवणूक करून त्यांना शारीरिक, आर्थिक किंवा व्हर्चुअल (इंटरनेटवर) हानी पोहचवतात. ते हे कसं करु शकतात?
लहान मुलं निरागस असतात. चुकीचे लोक त्यांचा फायदा कसे घेऊ शकतात हे त्यांना कळत नसते. त्यामुळे कोणाजवळ काय बोलावं व काय बोलू नये, हे सहसा त्यांना फार कमी कळतं. ह्या वृत्तीतूनच हे ऑनलाईन प्रिडेटर आपलं सावज शोधतात. सावज शोधण्यासाठी हे ऑनलाईन प्रिडेटर सोशल नेटवर्किंग साईटस्चा उपयोग करतात. ह्या साईटवरनं हे लोक मुलांचे फ्रेंड्स् बनतात व त्याच्याकडून त्यांची आर्थिक, कौटुंबिक, इत्यादी परिस्थिती जाणून घेतात. त्यानंतर त्यांना ह्या मुलांचे कच्चे दुवे कळले की मग सुरू होतो ह्यांचा खरा शिकारीचा डाव. आपल्या सर्वांना अदनान पात्रावाला खून खटला माहीत असेल. हे प्रकरण अशाच प्रकारचे होते. 
ह्या ऑनलाईन प्रिडेटरच्याव्यतिरिक्त ही, इंटरनेट वापरताना मुलांना अनेक चुकीची प्रलोभने खुणावत असतात. ती सहज शोधता व प्राप्त करताही येतात. मध्ये एक प्रसंग घडला. मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांशी बोलत होतो. त्यांच्या मुलीची परीक्षा होती व त्यातील कुठच्या तरी प्रोजेक्टकरिता त्याना इंटरनेटवरून काही महिती हवी होती जी त्यांनी मला शोधायची विनंती केली. मी त्यांना म्हणालो की मी माहिती शोधून तुम्हाला ईमेल करेन. तुम्ही घरी गेल्यावर आरामात वाचा. तर त्या मला म्हणाल्या की अरे आमच्या घरी आम्ही इंटरनेट घेतलेलं नाही. आमची मुलगी लहान आहे व दिवसभर एकटी असते त्यामुळे उगीच नको ती माहिती व गोष्टी तिच्या हाती इंटरनेटद्वारे लागायला नकोत. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ही फार मोठी समस्या असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यावर उपाययोजना शोधणं आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहूया की आपल्या अनुपस्थितीतसुध्दा आपण आपल्या मुलांना इंटरनेट वापरायला देऊनही त्यांना चुकीच्या गोष्टींपासून कसे दूर ठेवू शकतो.

के९प्रोटेक्शन वेब
www1.k9webprotection.com ह्या साईटचा उपयोग करून आपण आपल्या संगणकावरून कुठच्या साईटस् बघितल्या जाव्यात व कुठल्या साईटस् बघितल्या जाऊ नयेत हे ठरवू व विनियमित करू शकतो. ह्या साईटवरून आपल्याला त्यांच बेसिक एडिशन मोङ्गत डाऊनलोड करता येतं. त्यासाठी आपल्याला त्यांच्या साईटवर आपले नाव व ईमेल आय.डी. द्यावा लागतो. ह्या साईटकडून मिळणारे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या संगणकावर इन्स्टॉल करावे लागते. डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला त्यांच्या साईटवरील आपली नोंदणी झाल्यावर एक ईमेल पाठवला जातो. ज्यामध्ये आपल्या संगणकावर इन्स्टॉल करण्याचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची लिंक व ते ऍप्लिकेशन नोंदणीकृत करण्यासाठीची इन्स्टॉलेशन की असते. हे एकदा भरले की आपण हे सॉफ्टवेअर मोफत वापरू शकतो.
ह्या सॉफ्टवेअरचे उपयोग
* हे सॉफ्टवेअर विनियमित करण्यासाठी आपल्याला एक ऍडमिनिस्ट्रेटर पासवर्ड ठरवता येतो. ह्या ऍडमिनिस्ट्रेटर पासवर्डच्या मदतीने आपण ह्या  सॉफ्टवेअरचे नियंत्रण करू शकतो.
* ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला संगणकावरिल इतर वापरकर्त्यांना कुठल्या साईटस्चा ऍक्सेस द्यायचा हे ठरवता येते. ऍक्सेस कंट्रोलमध्येसुध्दा विविध प्रकार उदा: बेसिक, मॉडरेट, हाय, इत्यादि पर्याय उपलब्ध असतात.
* ह्या सॉफ्टवेअरच्या उपयोगाने आपण विशिष्ट प्रकारात मोडणार्‍या उदा: प्रौढांच्या, हिंसात्मक, द्वेषपूर्ण, इत्यादी साईट आपल्या संगणकावर उघडण्यापासून ब्लॉक करू शकतो.
* वेबसाईटसवर अनेक वेळा उपयोगाची माहिती, काही सॉफ्टवेअर, गाणी वगैरे असतात. पण त्याच साईटस्वर ह्या उपयोगाच्या माहितीच्या बाजूला ह्या प्रौढांच्या, हिंसात्मक, द्वेषपूर्ण, इत्यादि साईटस्च्या जाहिराती असतात, त्याही हे सॉफ्टवेअर ब्लॉक करून टाकते.
* वेबसाईटसच्या विविध प्रकारांच्याव्यतिरीक्त आपण कुठलीही वेबसाईट एकेरीपणे ही बंद करू शकतो. उदा: मला एक विशिष्ट वेबसाईट माहीत आहे ज्यावर कुठली तरी निरर्थक माहिती व चित्रं आहेत. पण ती हे सॉफ्टवेअर समजा ब्लॉक करत नसेल तर तसे ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्यासाठीचे विशिष्ट पर्याय आपण ह्या साईटद्वारे आपल्या संगणकावर करून घेऊ शकतो.
* त्याशिवाय आपल्या वेबसाईटच्या पत्यात एखादा विशिष्ट शब्द असणार्‍या साईटस् ही आपण ह्या सॉफ्टवेअरच्या वापराने ब्लॉक करू शकतो. उदा: समजा आपण ‘हरींश’हा शब्द निवडला. तर हा शब्द पत्यात असणार्‍या सर्व साईटस् हे सॉफ्टवेअर ब्लॉक करून टाकते


कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

0 comments:

Post a Comment