Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

बच्चे कंपनी

www.indianchild.com,


मुलांच्या सुट्टीचा वेळ कारणी लागावा, अशी पालकांची अपेक्षा असते. तर निदान सुट्टीतरी मनासारखी घालवू द्या, अशी मुलांची मागणी असते. या पालक-मुलांमधला वाद घराघरात सुरू राहतो. पण तो सोडविण्यासाठी आपण एक वेगळा पर्याय सहजपणे वापरू शकतो. त्यामुळे मुलांचा वेळ ज्ञान मिळविण्यासाठी जाईलच. शिवाय मुलांसाठी हा नवा आणि आकर्षक खेळ ठरेल. हा वेगळा पर्याय म्हणजे कंप्यूटर!!

त्यात काय नवीन, आमची मुलं तासनतास कंप्युटरवर बसलेली असतात, अशी प्रतिक्रिया  कदाचित काहीजण देतील. पण मनोरंजन आणि ज्ञान यांची सांगड घालणार्‍या साईटस्, ऑनलाईन एनसाक्लोपिडीया (विश्‍वकोश) व मुलांच्या ई-बुक्सबद्दल जाणून घेतलं, तर आपलं मत निश्‍चितपणे बदलेल. आणि आपण स्वतःहून मुलांना कंप्युटरचा अशारितीने वापर करण्यासाठी प्रोत्साहित  करू.
www.indianchild.com, www.pitara.com, सिंपल विकिपीडिया (http://simple.wikipedia.org) इत्यादी साईटस् ह्या आपल्या मुलांसाठी ज्ञानाचा खजिनाच ठरतील.
गुगल, याहू, विकिपीडिया या सारख्या साईटस् व सर्च इन्जिन्स ह्या जरी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यातली भाषा व त्यात माहितीचा शोध घेणे हे लहान मुलांना थोडे कठीण जाते. त्यासाठीच आपण ह्यावरील उल्लेखिलेल्या साईटसचा उपयोग करु शकतो.
इंटरनेटवर आपण जर लहान मुलांच्या साईटस् शोधल्या तर आपल्याला मुख्यत: अमेरिकन व ऑस्ट्रेलियन मुलांसाठीच्या साईटस् जास्त सापडतील. पण www.indianchild.comwww.pitara.com, या दोन पूर्णपणे भारतीय मुलांसाठी असणार्‍या साईटस् आहेत. या साईटस् मुलांना वापरायला आवडतील अशाच दिसायला अत्यंत आकर्षक व रंगीबेरंगी आहेत.
इंडियनचाईल्ड (www.indianchild.com) या साईटस्वर मुलांना आपल्या सौर प्रणाली (सोलार सिस्टीम) बद्दल माहिती मिळते. येथे मुलांसाठी चांगल्या व छोट्या, विनोदी व नितिमुल्यांचा संस्कार  करणार्‍या गोष्टीसुद्धा आहेत. पालकांसाठी आपल्या मुलांना इंटरनेट वर चुकीच्या गोष्टी वाचायला मिळण्यापासून कसे रोखता येईल त्याची माहिती ही या साईटस्वर आहेत. त्याशिवाय इतिहास, विविध पक्षी-प्राण्यांची माहिती (त्यांच्या रंगीत चित्रांसकट), बाल गीते, शैक्षणिक चित्रपट इत्यादि ह्या साईटवर आपल्याला बघायला मिळतात
या साईटवर मुलांना विविध हस्तकलेतील (क्राफ्ट) विविध आकृती बनवायच्या युक्त्या आहेत. त्याशिवाय मुलांसाठी प्रश्‍नोत्तरी (क्वीझ), व्याकरण व म्हणी, गणित, ह्या विषयावरील धडेही आहेत. मुलांना आवडणारे रंगवण्यासाठीची चित्रं ही साईटवर उपलब्ध आहेत. ह्या साईटवर खेळही आहेत. पण मुख्य म्हणजे ह्यातील बहुतेक खेळ हे शैक्षणिक पाया भक्कम करणारे पण तरीही मुलांना आकर्षित करतील असे आहेत. उदा: जिगसॉ, फुल्ली-गोळा, शब्दकोडी, इत्यादि. या साईटवर विज्ञान विषयासाठी एक खास विभाग आहे. या विभागात विविध विज्ञानातील विषयावरचे मुलभूत ज्ञान असलेले सोपे लेख आहेत उदा: ग्लोबल वॉर्मिंग, विविध वनस्पती, प्राणी, उपग्रह, रोग व औषधे, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी. त्याशिवाय या साईटवर गोष्टी, विनोद, कोडी, कविता, सुप्रसिद्ध व्यक्तींच्या गाथा, इत्यादि ही मुलांसाठी आहेतच.
भारतीय साईटस्नंतर आता आपण काही आंतरराष्ट्रीय साईटस् कडे वळूया.

वरिल उल्लेखिलेल्या साईटसच्याव्यतिरिक्त www.kids.net.au, http://kids.discovery.com, www.surfnetkids.com, www.4kids.org, www.hindukids.org, www.dimdima.com या साईटसही मुलांसाठी उपयोगाच्या आहेत.
मुलांसाठीची ई-बुक्स्
ह्या मुलांच्या साईटसच्याव्यतिरिक्त आपल्याला www.bestebooksworld.com, www.bibliotastic.com, www.getfreeebooks.com, www.smashwords.com, http://ebookbrowse.com, http://yourparentinghelp.com या साईटस्वर मुलांच्या उपयोगाची अनेक पुस्तके वाचायला व डाऊनलोड करायला मिळतात. पण या साईटस् मुलांना वापरण्यासाठी जरा अवघड असल्याकारणांनी व त्यावर काही वेळेस मुलांच्या नजरेस पडू नये असे (अडल्ट लिटरेचर) समोर येण्याची ही संभावना असल्याकारणाने पालकांनीच जर मुलांना ह्या साईटस् वापरुन पुस्तके डाऊनलोड करुन दिली तर ते संयुक्तिक ठरेल.

ह्या साईटस् पाहिल्या आणि गेल्या ८-९ वर्षांत ‘जमाना बदल गया है’ ची जाणीव झाली. पूर्वी ज्या वयात मुलं पाट्यांवर अभ्यास करायची, त्याच वयात नंतर पुस्तकं वापरायला लागली व आता सरळ संगणक. पण एवढं खरं की बदलणार्‍या काळाबरोबर पालक बदलले व तो बदल त्यांच्या मुलांना ही निट शिकवुन दिला तरच त्या मुलांचे भले होते व पालकांना ही त्यांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडता येतात. आपल्या आजच्या संवादानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना सुट्टीत काय उद्योग द्यावा ही चिंता थोडी तरी नक्कीच कमी झाली असेल.


कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

0 comments:

Post a Comment