Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच - LINKED-IN


www.linkedin.com

लिंक्डइन डॉट कॉम (linkedin.com) हा नावाप्रमाणेच हा विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना जोडणारा ऑनलाईन मंच (फोरम) आहे. इथे आपलं अकाऊंट बनविणे विनामूल्य  आहे आणि गुगल, याहूसारख्या -मेल अकाऊंट उघडण्याइतकेच सोपे आहे. हे लिंक्डइन डॉट कॉम हे जरी इतर ऑनलाईन मंचासारखे (उदा. ऑर्कुट वगैरे) वाटत असले, ज्यामध्ये असामाजिक घटकही कार्यरत असू शकतात, तरी असे असामाजिक घटक लिंक्डइन डॉट कॉम मध्ये कार्यान्वित करणे अवघड असते. कारण ह्यामधील नेटकरांच्या सर्व गतीविधिंवर मॉडरेटर्सचे बारकाईने लक्ष असते कोणताही अनुचित अनैतिक संदेश हा अर्ध्या ते एका तासात रद्द (डिलिट) केला जातो. शिवाय येथे अनैतिक गट कम्युनिटिज् किंवा ग्रुप्स बनविण्यावरही अंकुश ठेवला जातोे.


लिंक्डइन डॉट कॉममध्ये आपण इतर लोकांना कनेक्शनस् म्हणून जोडू शकतो. प्रत्येकाने स्वत:बद्दल उपलब्ध केलेली सर्व व्यावसायिक माहिती आपल्याला (प्रोफाईलस् बघून) कळू शकतात. ही माहिती अनेकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या कंपनीला आपल्याप्रॉडक्टची माहिती दुसर्या कंपनीपर्यंत पोहोचवायची  असेल तर... त्यासाठीलिंक्डइन डॉट कॉम  सारखं उत्तम माध्यम नाही. कारण इथे जर त्या कंपनीच्या अधिकार्यांचे प्रोफाईल असेल (सहसा ते असतेच) तर कुठल्या अधिकार्यांपर्यंत आपल्याप्रॉडक्टची माहिती पोहोचवायची, ते सहजपणे कळू शकतं. त्यामुळे काम सोपं होऊन जातं. म्हणूनचलिंक्डइन डॉट कॉम सेल्स मार्केटिंग मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आणि इतर क्षेत्रातील मंडळींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारेनेटवर्कींग पोर्टलआहे. यातून होत असलेला लाभ पाहता, अनेकजणांना याची आवश्यकता पटलेली आहे. म्हणूनच या नेटवर्कींग पोर्टलवर प्रोफाईलस् नोंदविणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे


प्रोफाईलस् म्हणजे ऑनलाईन बायो-डेटा. ह्या प्रोफाईलसमध्ये बायो-डेटात असणाऱ्या सर्व बाबी यात येतात. अधिक खोलात जाऊन सांगायचं तर आपलंं नाव, शिक्षण, अनुभव, सध्या करीत असलेल्या नोकरीचा किंवा व्यवसायाचा तपशील आणि आपल्याकडे असलेले चांगले गुण, वैशिष्ट्यांपासून ते आपल्याला मिळालेले सन्मान पुरस्कार, वैयक्तिक माहिती, ‘लिंक्डइन डॉट कॉमच्या प्रोफाईलमध्ये दिली जाते. अनेक गोष्टींसाठी ह्या बाबी उपयोगी ठरतात आणि त्याचा लाभ होऊ शकतो. उदा. नोकरीचा शोध, संभाव्य ग्राहकांचा शोध आणि  संपर्क, जून्या मित्रांशी संपर्क आणि नव्या मित्रांचा  शोध हे सारंलिंक्डइन डॉट कॉम च्या माध्यमातून होऊ शकतं. त्यासाठी इथे वेगवेगळे विभाग असतात. ‘लिंक्डइन डॉट कॉम मध्ये व्यावसायिकांच्याच नव्हे तर कंपन्यांच्या प्रोफाईलस्ही असतात. त्यामुळे केवळ वैयक्तिक पातळीवर नाही तर कंपन्यांच्या व्यवहारांमध्येही हे नेटवर्कींग पोर्टल महत्त्वपूर्ण भूमिका  बजावू लागले आहे


लिंक्डइन डॉट कॉममध्ये शिफारस (रेकमेंडेशन)करण्यासाठी स्वीकारण्यासाठीही एक विभाग असतो. येथे आपण आपल्या सहकारी, वरिष्ठ कनिष्ठ सह-कर्मचारी मित्र ह्यांच्यासाठी शिफारशी करू स्वीकारू शकता. ह्या शिफारशींचा आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो, विशेषत: नोकरी शोधताना. जर आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्या वरिष्ठांची आपल्याबद्दलची चांगली शिफारस असेल तर नव्या ठिकाणच्या नोकरीतील बॉसला आपल्याबद्दल जास्त विश्वा वाटतो. शिफारस स्वीकारणे किंवा नाकारणे आपल्यावर अवलंबून असते.
लिंक्डइन डॉट कॉममध्ये व्यावसायिक गटही (ग्रुप्सअसतात, उदा. डिफेन्स पर्सनल ग्रुप मार्केटिंग मॅनेजर्स ग्रुप, इत्यादी. ह्या गटांमधील सभासद त्या क्षेत्राशी निगडित नवीन घडामोडी, विचारपद्धती इत्यादिबद्दल विचार-विनिमय करतात संवाद साधतात. ही प्रक्रिया सतत सुरू असते. यामुळे आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत त्या क्षेत्राशी निगडित संघाचे जर आपण सदस्यत्व घेतले तर आपल्याला त्या क्षेत्रातील घडामोडी आपल्याला कळतात. आपल्या क्षेत्रातील मंडळींचे विचार, कार्यपद्धती आणि प्रतिक्रिया जाणण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होतो. हे सदस्यत्व आपणास मो मिळते. शिवाय या संवादातून आपल्याला मोलाची माहिती, इतर प्रदेशामधील बिझनेस पार्टनर्स मिळविण्यासाठीही उपयोग होतो. काही वेळेस तर लाखो-करोडोंचे व्यवहारलिंक्डइन डॉट कॉम वरून झाल्याच्या नोंदी आहेत.

याठिकाणी देण्यात आलेली माहिती विश्वासार्ह असते का? असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. स्पष्ट सांगायचं तर यानेटवर्कींग प्रोफाईलमध्ये तशी सोय नाही. पण एखाद्या अपरिचिताशी व्यवहार करताना आपण जी दक्षता आणि सावधगिरी बाळगतो, तशी सावधानता बळगली तर या व्यवहारात आपले नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

लिंक्डइन डॉट कॉम मध्ये नोकऱ्यांसाठी एक वेगळा विभाग आहे. हल्ली नोकऱ्यांच्या पोर्टल्सने भाववाढ केली आहे हे पोर्टल्स उमेदवार नोंदणीवरही शुल्क आकारत आहेत. त्यामुळे हल्ली नोकरी शोधणारेही ह्या पोर्टल्सवर कमी प्रमाणात नोंदणी करतात. त्यामुळे हल्ली मोठ्या कंपन्याहीलिंक्डइन डॉट कॉम वरून उमेदवार शोधण्यास पसंती देत आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्याह्युमन रिर्सोस डेव्हलपमेंट (एचआर) अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे. कंपन्यांमधील रिक्त पदांबद्दल कंपन्या व्यावसायिक गटांमध्ये (ग्रुप्स) सूचना प्रकाशित करतात. त्यावर उमेदवार अर्ज करू शकतात.

लिंक्डइन डॉट कॉममध्ये आपल्या कनेक्शनन्सनी  पोस्ट केलेले अपडेटस् आपल्या होम पेजवर आपल्याला समजतात. त्यामुळे कोण कोणाशी जोडले जात आहे हे समजण्यास मदत होते ह्यातूनच आपल्याला उपयोगी पडणाऱ्या नव्या ओळखी होतात. शिवाय कोणकोणत्या नवीन योजनेवर, प्रोजेक्टवर कोण काम करत आहे हे ही कळते.

आत्ताचं युग हे माहितीचं युग म्हणून ओळखलं जातं. मात्र या माहितीच्या युगात आपल्यासमोर  येणारी माहिती देखील फा आहे. ही सर्वच माहिती आपल्याला असू शकत नाही, पण निदान आपल्या क्षेत्रातील अद्ययावत आणि उपयुक्त ठरणारी माहिती आपल्यालालिंक्डइन डॉट कॉम वरून मिळते. या अत्यावश्यक माहितीचा आपल्या व्यवसायासाठी  सुयोग्यरितीने  वापर करण्याचं  कौशल्य तुमच्या अंगी असेल, तर हे नेटवर्कींग पोर्टल तुमच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनून जाईल. तेव्हा आपल्या व्यवसायाची माहिती घेणाऱ्या-देणाऱ्या आणि मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी - ‘लिंक्डइन डॉट कॉम


कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

0 comments:

Post a Comment