Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

फेसबुकचा दुसरा फेस


एका तज्ञाला फेसबुक म्हणजे ‘मॉडर्न जमान्यातील चाळ, जिच्यामध्ये गप्पा मारायला लोकांचे दरवाजे कायम उघडे असतात’ असे बोलल्याचे ऐकले होते. फेसबुक ही सध्याची सर्वात प्रचलित व सर्व वयोगटांमध्ये वापरली जाणारी सोशल नेटवर्किंग साईट आहे. मुख्यत: तरुणांमध्ये या साईटविषयी कुतूहल व वापर सर्वात जास्त आहे. पण हा वापर मुख्यत: चॅटिंग करण्यासाठी व मित्र वाढवण्यासाठी केला जातो. पण ह्याच फेसबुकवर आज कोटीहून अधिक ऍक्टिव्ह युझर्स आहेत. हा एक अत्यंत मोठा डेटाबेस असून त्याचा वापर अनेक कंपन्या व उद्योग आपली उत्पादने व सेवांच्या मार्केटिंग व ऍडव्हरटाईझिंगसाठी करीत आहेत. आजच्या आपल्या संवादातून आपण हे कसे होते ते बघणार आहोत. फेसबुकचा व्यावसायिक स्तरावर कसा बदलू शकतो ते जाणून घेऊया.

फेसबुक पेजेस्
किती लोकांना माहिती आहे ह्याची कल्पना नाही पण फेसबुकमध्ये माणसांच्या व कंपन्यांच्या प्रोफाईल्स् ह्या दोन्ही वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. माणसांच्या वैयक्तिक प्रोफाईल्स् असतात तर कंपन्यांची फेसबुक पेजेस् असतात. कंपन्यांसाठी वैयक्तिक प्रोफाईल्स् फेसबुकवर बनवणे हे उचित नसते कारण जर आपण आपल्या कंपनीचे किंवा आपल्या व्यवसायाचे खाते वैयक्तीक प्रोफाईल्समध्ये बनवले तर फेसबुकच्या ऍडमिनिस्ट्रेटरद्वारे आपले हे खाते बंद करण्याची संभावना असते. आपल्या फेसबुक पेजवर आपण सुंदर व आकर्षक वॉलपेपरसारख्या इमेजेस् वापरू शकतो. जवळ-जवळ सर्वच बड्या व छोट्या कंपन्यांची स्व:ची फेसबुक पेजेस् आहेत. ह्याशिवाय खाजगी प्रोफाईल्स् व पेजेसमधील सर्वात मोठा फरक म्हणजे प्रोफाईल्स् ह्या फेसबुकवर खाते असल्याशिवाय कोणाला ही बघता येत नाही. तर फेसबुक पेज बाकी कोणाला फेसबुकवर आपली प्रोङ्गाईल नसतानाही पाहता येते. ह्या प्रोफाईल्स्चे ऍडमिनिस्ट्रेटर अधिकार हे एकापेक्षा अधिक व्यक्तीकडे असणे हे सोयीस्कर ठरते. कारण समजा जर ऍडमिनिस्ट्रेटरच जर नोकरी सोडून गेला तर आपले काम कुठेही अडत नाही.  फेसबुक पेजेस्‍ची कंपन्यांसाठीची मुख्य संधी म्हणजे ही आपली पेजेस् वर येऊन गेलेले विविध ‘फॉलोअर्स्’ व त्यांचे लिंग, वय इत्यादिंवरची माहितीची संपूर्ण आकडेवारी मिळते.

फेसबुक इव्हेंटस
फेसबुकमध्ये आपण इव्हेंटस ही बनवो शकतो. ह्या इव्हेंटसद्वारे आपण आपल्या व्यवसायासंबंधीची एखादी बैठक, संमेलन, कार्यशाळा, फंडरेझिंग इव्हेंटस यांच्याबद्दलची माहिती इतरांना पुरवू शकतो. इव्हेंटसद्वारे आपण आपल्या फॉलोअर्सना होणार्‍या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊ शकतो. ही फेसबुक पेजेस व इव्हेंटस नियंत्रित करण्यासाठी मात्र फेसबुकवर वैयक्तिक प्रोफाईलस्‍ असलेल्या व्यक्तिच असाव्या लागतात. इव्हेंटचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटदेखील एकच वेळेस एकापेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात.

फेसबुक ग्रूप्स्
फेसबुक ग्रूप्स् म्हणजे सारखीच आवडनिवड असणार्‍या युझर्स्‍चे समूह कोणतीही व्यक्ती स्वत:ही कोणत्या ग्रूपमध्ये जडून घेण्यासाठी विनंती करू शकतो. ह्या ग्रूप्स् मध्ये आपल्याला त्या ग्रूपमधील आंतरिक सदस्यांबरोबर चॅट करण्याची सोय मिळते. अगोदर उल्लेखिलेले इव्हेंट्स्सुद्धा या ग्रूप्स्मध्ये आंतरिक बनवता येतात. एखाद्या विशिष्ट संकल्पनेबद्दल, उत्पादनाबद्दल किंवा अगदी ओपिनियन पोल्ससाठी देखील ह्या ग्रुप्सचा खूपच उपयोग होतो.

फेसबुक ऍप्लिकेशन्स्
फेसबुक ऍप्लिकेशन्स् हे म्हणजे फेसबुकच्या आपल्या खात्यातच उपलब्ध असणारे मोफत सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स् असतात. ह्या ऍप्लिकेशनस्‍चा उपयोग करून आपण आपली अनेक कामे सोपी करू शकतो; त्याचबरोबर आपल्या फेसबुकच्या पेज किंवा प्रॊफाईलबद्दलची लोकप्रियता व लोकांची आवड जाणून घेऊ शकतो.

फेसबुक कनेक्ट
फेसबुक कनेक्टने आपण फेसबुकवरील युझर्सना त्यांच्या फेसबुकमधील खात्यामधून आपल्या वेबसाईटवर लॉगीन करण्याचा पर्याय देऊ शकतो. फेसबुक कनेक्ट हे अनेक वेळेस www.disqus.com या लॉगीन साईटच्या मदतीने ही वापरले जाते. त्यामुळे पुन्हा वेगळे लॉगीन करण्याची तसदी वाचते. फेसबुक कनेक्टचा अजून एक उपयोग म्हणजे आपल्या साईटवरील कुठलीही आवडलेली गोष्ट उदा: लेख, उत्पादन / सेवा याबाबत जे आपल्या साईटवरील वाचकांना आवडेल ते त्यांना त्यांच्या फेसबुकच्या खात्याच्यामार्ङ्गतच फेसबुकवर शेअर (पुन:प्रकाशित) करता येतं. हे पुन:प्रकाशित झाल्यामुळे ज्या युझर्सने प्रकाशित केलेले असते त्याच्या सर्व फ्रेंडस्‍ना ही गोष्ट न्यूजफिड (अपडेटस्) द्वारे कळते.
फेसबुक वापरून आपण आपल्या पेज किंवा प्रोफाईलचा अधिक योग्य रितीने प्रचार व प्रसार कसा करू शकतो
* फेसबुकवरील आपल्या कुठच्याही अपडेटवर दुसर्‍या कोणी कॉमेंट दिली किंवा ‘लाईक’ केले की त्या व्यक्तीच्या सर्व फ्रेंडसना हा अपडेट दिसतो, त्यामुळे आपल्या पेजची दृश्यता वाढते.
* आपल्या पेज किंवा प्रोफाईलची दृश्यता वाढवण्यासाठी आपण आपल्या पेजवर सतत कुठचे तरी चांगले लेख, माहिती, चित्र, व्हिडीओज्, ऑफर्स, इत्यादीं टाकत रहावे.
* आपलं हे पेज जितके संवादात्मक ठेवू त्या प्रमाणात व्हिझिटर आपल्या पेजवर अधिक प्रमाणात राहतील. ह्यासाठी आपल्या फेसबुक क्वेशन्स चा चांगला उपयोग करता येतो. ह्यामध्ये आपण इतरांना आपल्या उत्पादन किंवा सेवेबद्दल प्रश्‍न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेता येतात.
* एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आपण सूज्ञता दाखवून आपल्या पेजवर इतरांकडून येणार्‍या कॉमेंटसवर नीट अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
* आपल्या पेजवर जेवढ्या लोकांनी कॉमेंटस् दिल्या आहेत त्यांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी आपण थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांचा आपल्यावरील विश्‍वास तर वाढतोच शिवाय लोकांना आपले पेज अधिक आवडण्यासही मदत होते.
* पण फेसबुकमध्ये टाकलेली कुठचीही माहिती ही फेसबुक पुरतीच मर्यादित राहत असल्याने आधी आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर टाकून मग ती माहिती फेसबुकवर टाकली तर तिची दृश्यता सर्च इंजिस् (उदा: गुगल) मध्ये अधिक वाढते.
* जर आपले फेसबुक वर खाते असेल तर त्यात व्यवसायिक मित्र व खाजगी मित्र ह्या दोघांमध्ये समतोल राहील ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

फेसबुकच्या वरील प्रचार व प्रसाराच्या पद्धती ह्या सतत व नकळत बदलत राहतील. पण ह्या पद्धतींचा मूलगाभा हा आपल्या पेजवरील संवादात्मकता, उपयुक्त व नवनवीन माहितीची देवाण-घेवाण, प्रदर्शनिय कलात्मकता आणि आपले विक्रीचे कौशल्य ह्यावरच अवलंबून असेल. आपल्या ह्या संवादातून आपल्याला ‘फेसबुकचा दुसरा चेहराही’ बघायला मिळाला आहे. त्यामुळे फेसबुकचा चॅटिंग व टाईमपासच्या व्यतिरिक्त ही बर्‍याच उपयुक्त कारणांसाठी करता येतो हे समजणे व जाणणे गरजेचे आहे.

0 comments:

Post a Comment