Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

Showing posts with label Veg recipes. Show all posts

साहित्य:
८-१० आमसूल, थोड पाणी, थोडासा गूळ, मीठ, जिरे, ओली मिरची.

कृती:
८-१० आमसूल १०मि. पाण्यात भिजत टाकावी. नंतर ती भिजल्यावर पाण्यातून काढून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये टाकावीत. त्यात मीठ, जिरे, ओली मिरची हे चवीप्रमाणे टाकावे. थोडेसे फिरवून घेणे. त्यात साधारणत: वाटलेल्या गोळ्या एवढाच गूळ घालणे व पुन्हा मिक्सरमध्ये सर्व मिश्रण एकत्र फिरवावे. चटणी तयार झाली. ही चटणी जर पाटयावर वाटल्यास छान गुळगुळीत होते.

आमसूलाची चटणी

अर्धा किलो कच्ची पपई, १ मोठा चमचा तिखट, ५० ग्रॅम आले-लसूण, १ कप व्हिनेगर.

कृती:
पपई साल काढून पातळ फोडी करून लसूण, आले वाटून फोडींना लावून ठेवावे. त्यात तिखट-मीठ घालून बरणींत भरावे. वरून व्हिनेगर घालावे. दोन दिवस मधून मधून ढवळत रहावे. नंतर खायला द्यावे.

पपईचे लोणचे

पाव किलो बीट, अर्धा जुडी लाल माठ, २ टेबलस्पून तूप, १५० ग्रॅम खवा, पाऊण वाटी साखर, ४-५ वेलच्या.
सजावटीसाठी- २ बदाम, १ शीट चांदी वर्ख.

कृती:
प्रथम बीट सोलून किसूव घ्यावे.लाल माठ निवडून बारीक चिरावा. नंतर पातेल्यात २ टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर वरील मिश्रण चांगले परतून घ्यावे. अगदी घट्ट होईपर्यंत घाटावे. घट्ट झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोळे वळून थंड झाल्यावर बदामाचे बारीक तुकडे व चांदी वर्ख लावावा.

बीट-लाल माठाचे काला जामून

२ वाटी पनीरचे तुकडे, १ जुडी मेथीची भाजी, १ टोमॅटो, १ चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, मीठ, २ टेबलस्पून तेल, ६-७ काजू.

कृती:
पनीरचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून बदामी रंगाचे तळून घ्यावेत. मेथीची पाने खुडून घ्यावीत. टोमॅटो बारीक कापावा. काजू थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करावी.
 
तेल तापवून त्यात मेथीची पाने परतावी. पाने शिजली की व मऊ पडली की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटोला रस सुटला की त्यात मिरची पूड, हळद, धनेपूड व जिरेपूड, मीठ घालून मंद गॅसवर शिजवावे. २ मि. त्यात तळलेले पनीर घालून सर्व ढवळून घ्यावे. त्यात काजूची पेस्ट घालावी. वाफ आली की गॅस बंद करावा.

पनीर मेथी

२ वाटया बारीक रवा, १ नारळाचे दाटसर दूध, २ सपाट वाटया साखर, ४-५ वेलदोडयाची पूड, मीठ, काजुचे तुकडे, तूप, सोडा.

कृती:
नारळाच्या दाट दूधात रवा, साखर घालून चिमूटभर मीठ घालून भज्याच्या पीठासारखं पीठ भिजवावे. पीठ ३-४ तास भिजल्यावर त्यात ४ टेबलस्पून तूप गरम करून घालावे. पाव चमचा सोडा घालून खूप फेटावे. त्यात वेलदोडा पूड, काजू, बेदाणे व केशर(जमल्यास) घालावा. आप्पेपात्र गरम करून त्यात प्रत्येक वाटीत१ चमचा तूप घालावे. आप्प्याचे पीठ प्रत्येक वाटीत अर्धी वाटी घालावे. मंद आच ठेवून आप्पेपात्रावर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढावे. आप्पे फुगून आलेले असतील ते विणायच्या सुईने अथवा चमचाच्या टोकाने पात्रात उलटवावे. दोन्ही बाजूने गुलाबी झाले की काढावे.

आप्पे

पाव किलो तांदळाचे पीठ, अर्धा लहान दुधी भोपळा, कढीपत्ता , कोथिंबीर, मीठ, हळद, हिरवी मिरची, तेल.

कृती:
प्रथम दुधी भोपळा किसून घ्यावा. त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घालावी. नंतर तांदळाचे पीठ, हळद व मीठ घालून पाणी न घालता मळावे. छोटेछोटे गोळे थापून तेलात तळावे.

दुधी भोपळ्याचे वडे

पाव किलो बारीक चिरलेला कोबी, ४ मिडीयम कांदे, १ कप तुरीची डाळ १ तास भिजत घालणे. १ कप तांदूळ १ तास भिजत घालणे. १ वाटी किसलेला नारळ, ८ बेडग्या मिरच्या भाजून घेणे. थोडी चिंच, हळद पावडर, मीठ.

कृती:
तुरीची डाळ, तांदूळ, खोबरे, मिरच्या, चिंच, मीठ, हळद मिक्सरमध्ये बारीक सुके वाटून घ्यावे. पाणी कमी घालावे. नंतर वरील मिश्रणांत बारीक चिरलेला कोबी व कांदा घालणे. मिश्रण ढवळून सारखे करावे. नॉन स्टीक पॅनवर थोडे तेल घालून छोटी धिरडी करावी.

कोबीचे धिरडे

पडवळातल्या कोवळ्या बीया, थोडासा नारळ, १ चमचा तीळ, ४-५ हिरव्या मिरच्या, लिंबू, कोथिंबीर, चवीप्रमाणे साखर, मीठ, १ चमचा दाण्याचे कुठ, फोडणीचे साहित्य.

कृती:
थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यातच तीळ, मिरच्यांचे तुकडे, पडवळाच्या बीया व नारळ घालून चांगले परतावे. नंतर त्यात दाण्याचे कुट व साखर, मीठ घालावे. मिक्सरमध्ये ते वाटावे व नंतर लिंबू पिळावे.
साधारण पडवळाची भाजी केल्यावर चटणीचा हा प्रकार करता येतो.

पडवळांच्या बीयांची चटणी

एका नारळाचा चव(शक्य तितका पांढरा घ्यावा)त्याच्या निम्मे गूळ, जायफळ, तांदूळाची पिठी २ वाटया, २ चमचे लोणी, थोडेसे मीठ, मळण्यासाठी हाताला लावण्यासाठी तेलपाणी.

कृती:
प्रथम पातेलं गॅसवर ठेवून त्यात गूळ वितळण्याएवढे पाणी घालावे. त्यात गूळ घालावा. गूळ वितळल्यावर त्यात नारळाचा चव घालावा. मधून मधून ढवळावे. सुकत आल्यावर गॅस बंद करावा.

दुसरे पातेलं घेऊन त्यात पिठाइतकेच पाणी मोजून घ्यावे व उकळत ठेवावे. त्यात चवीला जरासे मीठ व लोणी घालावे. पाणी उकळल्यावर पातेले खाली घेऊन त्यात पिठी घालावी व नीट ढवळून गॅसवर वाफ यायला ठेवावे.(मंद गॅस). चांगली वाफ आली की गॅस बंद करावा. परातीत उकड काढून घ्यावी व गरम असतानाच मळायला घ्यावी. मळून गोळा करावा. मळताना हाताला तेल लावावे. पुरण एका डीशमध्ये घेऊन हाताने सारखे करावे. त्यात जायफळ पावडर घालावी. आता उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात पुरण घालून त्याला चुण्या घालाव्या व मोदक वळत वळत जावा. त्याला वर छोटेसे नाक काढावे. असे मोदक तयार करून घ्यावेत.
 
गॅसवर मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे. एका चाळणीवर पाणी ठेवून नी मोदकपात्रात ठेवावी. चांगली १२ ते १५मि. मिडीयम गॅसवर वाफ आणावी. तयार झाल्यावर एका प्लेटमध्ये ठेवावे. वर साजूक तूप घालून खावयास द्यावे.

उकडीचे मोदक

अर्धा किलो पडवळ, १ वाटी चण्याचे पीठ,१ वाटी नारळ, १ चमचा जिरे, तिखट, हळद, मीठ

कृती:
प्रथम पडवळाचे ३ इंचाचे तुकडे करावेत. आतील बीया काढून टाकाव्यात. चण्याचे पीठ, खवलेला नारळ, जिरे भरडून, तिखट, हळद, मीठ हे सगळे सारण एकत्र करून त्यात भरावे. मग गॅसवर पसरट भांडे ठेवून कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात भरलेले पडवळ ठेवावे. वाफेवर पाणी ठेवावे. पडवऴ शिजले की भाजी तयार झाली.

भरलेले पडवऴ

कच्ची पपई, हळद, लिंबू, मीठ, हिरव्या मिरच्या, राई, तेल, हिंग, साखर.

कृती:
पपई सोलून किसून घ्यावी. किसलेल्या पपईचा किस तेलावर हिंग, राई, मिरच्यांचे तुकडे परतून त्यावर घालावा. वरून लिंबू पिळून हळद, मीठ, साखर घालून ढवळावा व ५मि. शिजू द्यावा. नंतर गॅस बंदकरावा.) अश्याप्रकारे कोबीची पण भाजी करता येते).

पपईची किसलेली भाजी

७-८ भोपळी मिरच्या, १ वाटी खवलेले ओले खोबरे, हळद, १ चमचा राई, मीठ, तेल, लिंबाचा रस, कोथिंबीर.

कृती:
प्रथम मिरच्या धुवून त्यांना एका बाजूने चीर द्यावी. खवलेल्या खोबरे, मीठ, हळद, लिंबाचा रस मिसळून ते ह्या मिरच्यांत भरावे व पॅनमध्ये तेल घालून ह्या मिरच्या घालाव्यात. थोड्या थोड्या वेळाने परताव्या.

भरलेल्या भोपळ्या मिरच्या

मेथीची भाजी १ जुडी, चण्याच्या टाळीचे पीठ, थोडे बाजरीचे पीठ, तिखट, मीठ, हळद, बडीशेप.

कृती:
मेथीची भाजी धुवून बारीक चिरावी. त्यात चण्याच्याडाळीचे पीठ, बाजरीचे पीठ घालावे. तिखट, मीठ, बडीशेप, हळद घालुन घट्ट भिजवावे. वळकटया करून कुकरमध्ये १०-१२ मि. वाफवावे. कुकर थंड झाल्यावर काढून सुरीने काप द्यावे.

मेथी मुठीया

१ जुडी पालक, २ काड्या पुदीना, हिरवे वाटाणे, गाजर, फरसबी, गरम मसाला, बटर, तमालपत्र, वेलची, हळद, मीठ, जिरे, भोपळी मिरची, कोथिंबीर, बटाटे, तांदूळ कोलम, मसाला.

कृती:
पालकाची पाने व पुदीन्याची पाने धुवून उकडून घ्यावीत व मिक्सरमध्ये वाटताना त्यात गरम मसाला टाकून पेस्ट करून घ्यावी. गाजर, फसरबी, बटाटे बारीक चिरून उकडून घ्यावे. पातेल्यात बटर टाकून त्यात वेलची, जिरे, तमालपत्र टाकून फोडणी करून घ्यावी. त्यात पालकाची पेस्ट ओतावी व मसाला आणि हळद घालून चांगली ढवळावी. तेल सुटू लागल्यावर उकडलेल्या भाज्या व बारीक चिरलेली भोपळी मिरची टाकून ५-१०मि. शिजू द्यावी. कोलम तांदळाचा सुटा भात करून  घ्यावा, त्यात थोडे लिंबू व मीठ टाकावे म्हणजेच भात पांढरा शुभ्र व सुटा होईल. भाजी शिजल्यावर त्यात भात मिक्स करावा. वरून बटर घालावे. खाण्यात देतेवेळी वरून कोथिंबीर घालावी.

पालक पुलाव

कैरी,  ओलं खोबरं, उदडाची डाळ, तिखट, मेथी, हऴद, ४ चमचे धने, कोथिंबीर, गूळ चवीप्रमाणे, हिंग, जिरे, कढीपत्ता.

कृती:
ओलं खोबरं, मीठ, तिखट, हळद घालून वाटावे. थोड्या तेलात हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालुन फोडणी करावी. फोडणीत कच्च्या कैरीचे तुकडे घालून शिजवावे. गरम उकऴते पाणी त्यात घालून गूळ एक उकळी आणावी.

कैरीची आमटी

कुळथाचे पीठ, कोकम(१/२), कांदा, लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या.

कृती:
गॅसवर पातेले गरम झाले की तेल ओतावे. तेलात लसणीच्या पाकळ्या व थोडा कांदा फोडणीला घालावा. तसेच थोडा कांदा पीठात घालावा. पाणी घालून किंचित पातळ करावे. मिरच्या घालाव्यात. त्यानंतर पीठ फोडणीला घालावे. थोडीशी हळद व मीठ घालून ढवळत राहावे. चवीला आंबट म्हणून एक कोकम घालावा. कढ आला की किसलेले खोबरे घालावे.

कुळथाचे पिठले

१ वाटी शिंगाड्याचे पीठ,  अर्धी वाटी शेंगदाण्याचे कुट, हिरव्या मिरच्या वाटून, मीठ, जिरेपूड, तूप.

कृती:
शिंगाड्याचे पीठ, शेंगदाण्याचे कुट व एक चमचा गरम तूप एकत्र करावे, त्यात मिरची व मीठ घालावे. पाणी घालून पीठ सैलसर भिजवावे व गरम तूपातून तळून काढावीत. आवडीप्रमाणे बटाटा व केळ्याचे काप घालू शकता.

शिंगाड्याची भाजी