Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

सुके चिकन वा मटण

साहित्य:
अर्धा किलो चिकन, अर्धा किलो कांदे, लसूण-आले- मिरचि पेस्ट, २मोठे चमचे अख्खा मसाला, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मोठी वेलची, शहाजिरे, जायपत्ती, लहान वेलची, हळद, मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ, १५० ग्रॅम दही, तेल(धने-बडिशेप यांची जाडसर पूड करून पुरचुंडी करणे.

कृती:
प्रथम चिकन धुवून, निथळवून घेणे. त्यात हिरव्या मसाल्याचे वाटण लावणे. दही लावून ठेवावे.( साधारण अर्धा तास).
कांदा पातळ चिरावा. पातेल्यात तेल घालून कडकडीत तापल्यावर सर्व गरम मसाला फोडणीस घालणे. नंतर कांदा मंद गॅसवर गुलाबीसर होईपर्यंत परतणे. हळद, तिखट, मीठ, धने-जिरे पावडर घालून परतावे. मग चिकन घालून परतावे. पाणी अजिबात घालू नये. चांगले मिक्स करून वर पाण्याचे झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यावे. चिकन करपत नाही ही काळजी घ्यावी. आवडत असल्यास वरून कुरकुरीत च
तळलेला कांदा घालावा. कोथिंबीर घालून परोठ्याबरोबर  खावयास द्यावे.

0 comments:

Post a Comment