Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

उकडीचे मोदक

साहित्य:
एका नारळाचा चव(शक्य तितका पांढरा घ्यावा)त्याच्या निम्मे गूळ, जायफळ, तांदूळाची पिठी २ वाटया, २ चमचे लोणी, थोडेसे मीठ, मळण्यासाठी हाताला लावण्यासाठी तेलपाणी.

कृती:
प्रथम पातेलं गॅसवर ठेवून त्यात गूळ वितळण्याएवढे पाणी घालावे. त्यात गूळ घालावा. गूळ वितळल्यावर त्यात नारळाचा चव घालावा. मधून मधून ढवळावे. सुकत आल्यावर गॅस बंद करावा.

दुसरे पातेलं घेऊन त्यात पिठाइतकेच पाणी मोजून घ्यावे व उकळत ठेवावे. त्यात चवीला जरासे मीठ व लोणी घालावे. पाणी उकळल्यावर पातेले खाली घेऊन त्यात पिठी घालावी व नीट ढवळून गॅसवर वाफ यायला ठेवावे.(मंद गॅस). चांगली वाफ आली की गॅस बंद करावा. परातीत उकड काढून घ्यावी व गरम असतानाच मळायला घ्यावी. मळून गोळा करावा. मळताना हाताला तेल लावावे. पुरण एका डीशमध्ये घेऊन हाताने सारखे करावे. त्यात जायफळ पावडर घालावी. आता उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात पुरण घालून त्याला चुण्या घालाव्या व मोदक वळत वळत जावा. त्याला वर छोटेसे नाक काढावे. असे मोदक तयार करून घ्यावेत.
 
गॅसवर मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे. एका चाळणीवर पाणी ठेवून नी मोदकपात्रात ठेवावी. चांगली १२ ते १५मि. मिडीयम गॅसवर वाफ आणावी. तयार झाल्यावर एका प्लेटमध्ये ठेवावे. वर साजूक तूप घालून खावयास द्यावे.


0 comments:

Post a Comment