Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

पालक पुलाव

साहित्य:
१ जुडी पालक, २ काड्या पुदीना, हिरवे वाटाणे, गाजर, फरसबी, गरम मसाला, बटर, तमालपत्र, वेलची, हळद, मीठ, जिरे, भोपळी मिरची, कोथिंबीर, बटाटे, तांदूळ कोलम, मसाला.

कृती:
पालकाची पाने व पुदीन्याची पाने धुवून उकडून घ्यावीत व मिक्सरमध्ये वाटताना त्यात गरम मसाला टाकून पेस्ट करून घ्यावी. गाजर, फसरबी, बटाटे बारीक चिरून उकडून घ्यावे. पातेल्यात बटर टाकून त्यात वेलची, जिरे, तमालपत्र टाकून फोडणी करून घ्यावी. त्यात पालकाची पेस्ट ओतावी व मसाला आणि हळद घालून चांगली ढवळावी. तेल सुटू लागल्यावर उकडलेल्या भाज्या व बारीक चिरलेली भोपळी मिरची टाकून ५-१०मि. शिजू द्यावी. कोलम तांदळाचा सुटा भात करून  घ्यावा, त्यात थोडे लिंबू व मीठ टाकावे म्हणजेच भात पांढरा शुभ्र व सुटा होईल. भाजी शिजल्यावर त्यात भात मिक्स करावा. वरून बटर घालावे. खाण्यात देतेवेळी वरून कोथिंबीर घालावी.

0 comments:

Post a Comment